मुंबई : सध्या सगळीकडे विराट-अनुष्काच्या लग्नाची चर्चा आहे. त्यांचे फोटोज, विधींचे फोटोज सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. 


शाही थाट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट-अनुष्काच्या लग्नाच्या ड्रेसपासून ज्वेलरीपर्यंत सर्व काही शाही होतं. त्याचीही सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. त्याचदरम्यान, विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीबाबत काही खास माहिती हाती आली आहे. 


नुष्कीसाठी आणली खास अंगठी


ही खास अंगठी शोधायला विराटला तब्बल तीन महिने लागले. या अंगठीत एक खास हिराही बसवण्यात आला आहे. ऑस्ट्रियाच्या एका डिझायनरनं ही अंगठी डिझाईन केली आहे. या अंगठीची खासियत म्हणजे, ही अंगठी तुम्ही जेवढ्या अँगलमधून पाहाल तितक्यांदा तिची डिझाईन वेगवेगळी दिसेल. या अंगठीची किंमत तब्बल 1 कोटी आहे.