मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील सगळ्यात लोकप्रिय जोडी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही जोडी जिथे ही दिसते तिथे साऱ्यांच्या नजरा खिळतात. युवराज - हेजल, जहीर - सागरिकाच्या पाठोपाठ आता ही स्पोर्ट्स आणि कबॉलिवूडमधील अनुष्का - विराटची जोडी चर्चेत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विराट - अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. डिसेंबर महिन्यात हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा होती. आता या महिन्याच्या १२ डिसेंबरला हे शाही लग्न होणार असल्याचं बोललं जात आहे. 


कधी आणि कुठे होणार लग्न?


हे दोघेही नुकतेच जहीर आणि सागरिकाच्या लग्नात एकत्र पाहायला मिळाले. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. पण बहुदा आता या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. या अगोदर ते सर्व चर्चांना नकार देत होते. मात्र आता असे सांगण्यात येत आहे की, या लग्नाला दोघांच्या अगदी जवळची मंडळी असणार आहे. या दोघांचं लग्न १२ डिसेंबरला म्हणजे मंगळवारी होणार असून ९ डिसेंबर शनिवारपासून सर्व विधींना सुरूवात होणार आहे. 


दोघांचं नातं 


सुरूवातीला अनुष्का - विराट आपलं नातं लपवत असतं. मात्र आता हे दोघेही बऱ्याच कार्यक्रमात एकत्र दिसले आहे. मात्र आजही अनुष्का तिच्या पर्सनल आयुष्याबाबत आणि विराट सोबत असलेल्या नात्याबद्दल अगदी मनमोकळेपणाने बोलताना दिसत नाही. हल्लीच एका झी टीव्हीवरील कार्यक्रमात आमीर खानसोबत विराट आणि अनुष्का एकत्र दिसले.