5.32 लाखाच्या या कारमध्ये 7 लोकांचे कुटुंब करू शकते आरामदायी प्रवास, मायलेजही जबरदस्त

भारतात मोठ्या प्रमाणात 7 सीटर कारला मागणी आहे. कारण मोठे कुटुंब देखील या कारमध्ये आरामदायी प्रवास करू शकते. 

| Dec 21, 2024, 17:13 PM IST
1/7

मारुती कंपनी

देशातील नंबर वन कंपनी ही मारुती कार कंपनी आहे. या कंपनीकडे अनेक कार आहेत ज्यांनी भारतासह इतर ठिकाणांहून देखील मोठी मागणी आहे. 

2/7

किंमत

मारुतीच्या या कारमध्ये एक अशी कार आहे, जिची किंमत 5.32 लाख रुपये इतकी आहे. या कारमध्ये 7 लोकांचे कुटुंब अगदी आनंदाने प्रवास करू शकते. 

3/7

Maruti Suzuki Eeco

ही कार भारतात खूप प्रसिद्ध आहे. मायलेजमध्ये देखील ही कार जबरदस्त आहे. या कारचे नाव Maruti Suzuki Eeco आहे. 

4/7

कारचा वापर

Maruti Suzuki Eeco या कारचा उपयोग विविध कामाकरिता केला जातो. ज्यामध्ये डिलिव्हरी व्हॅन, स्कूल व्हॅन, आणि अ‍ॅम्ब्युलन्ससाठी देखील या कारचा वापर केला जातो. 

5/7

टॉप व्हेरिएंट

तसेच यामध्ये सीएनजी किटमुळे देखील जबरदस्त मायलेज मिळते. या कारची बेस व्हेरिएंटची किंमत 5.27 लाखांपासून टॉप व्हेरिएंटसाठी 6.53 लाख रुपयांपर्यंत आहे. 

6/7

मायलेज

या कारच्या इंजिनला 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्ससह जोडले आहे. ही कार पेट्रोलमध्ये 19.71 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर CNG मध्ये 26.78 किमी मायलेज देते. 

7/7

आरामदायी प्रवास

जर तुम्ही मोठ्या कुटुंबासाठी कार घेत असाल तर ही कार उत्तम आहे. या कारमध्ये 7 लोकांचे कुटुंब एकदम आरामात प्रवास करु शकते.