विराट कोहलीला बाबा बनण्याआधी शिकायचीय `ही` गोष्ट
मेरी कॉमने सांगितलेल्या मार्गावर कोहलीला चालायचय
नवी दिल्ली : टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहली येत्या जानेवारीमध्ये बाबा बनणार आहे. दरम्यान कोहलीला बॉक्सिंगमध्ये सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरी कॉमकडून त्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत. नवा पाहुणा घरात आल्यावर कोहलीची जबाबदारी देखील दुप्पट होणारेय अशा वेळी कॅप्टन्सी आणि वडीलपणाची जबाबदारीमध्ये ताळमेळ साधण्यासाठी तो मेरी कॉमकडून सल्ला घेणारेय.
मेरी कॉमने सांगितलेल्या मार्गावर कोहलीला चालायचय. कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात बाळाला जन्म देणारेयत.
मेरी कॉमच्या अनुष्काला शुभेच्छा
आई वडीलांची भूमिका आणि करियरचे व्यस्त शेड्यूल्ड यामध्ये मध्य साधणं शिकण्यासाठी तुमच्यासारखं दुसरं कोणी नसेल असे कोहली म्हणाला.
रिंगमध्ये आजही आपला दबदबा कायम राखणाऱ्या ३७ वर्षीय मेरी कॉमशी कोहलीने इंस्टाग्रामवर चॅट केले. तुम्ही एक आई आहात. तुम्ही सराव, इतक्या साऱ्या स्पर्धा एवढ सगळ केलंय. यामध्ये कसे संतुलन राखले' असे त्याने म्हटले.
लग्नानंतर माझे पती माझ्यामागे खंबीर होते. त्यांनी मला खूप सहकार्य केले. मला जे पाहीजे त्या सर्व गोष्टींची त्यांनी काळजी घेतली. ते एक आदर्श पती आहेत. याशिवाय माझी मुलं देखील कोणापेक्षा कमी नाहीत असे मेरी कॉम म्हणाल्या.
आपल्या देशातील महिलाच नव्हे तर सर्वच महिलांसाठी तुम्ही आदर्श आहात. तुम्ही विविध आव्हान पार करुन आयुष्यात खूप काही मिळवलंय असं तो म्हणाला.
आम्ही आई वडील बनणार आहोत. तुम्ही जे काही केलंय त्यातून आम्ही प्रेरणा घेतो. तुम्ही सांगितलेल्या रस्त्यावर आम्ही चालू असे कोहली म्हणाला.