नवी दिल्ली : टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहली आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करतोय. ५ नोव्हेंबर १९८८ ला दिल्लीमध्ये त्याचा जन्म झाला होता. आजच्या पिढीतील सर्वश्रेष्ठ खेळाडुंमध्ये त्याची गणना होते. आपल्या करियरमध्ये त्याने यशाची अनेक शिखरं पार केली आहेत. रन मशिन म्हटलं जाणाऱ्या स्टार प्लेअरची बॅट बोलते ते भल्याभल्या बॉलर्सची लाइन लेंथ बिघडते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्ट २००८ मध्ये विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरची सुरुवात केली आणि आजपर्यंत त्यांनी मागे वळून पाहीले नाही. १२ वर्षाच्या कारकिर्दीत कोहलीने अनेक रेकॉर्ड्स आपल्यानावे केले आहेत. त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जाते. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिनच्या रेकॉर्डशी तो खूप जवळ आहे. 


कोहली सध्या ज्या फॉर्मात बॅटींग करतोय ते पाहता लवकरच तो वनडेतील सर्वाधिक शतक पूर्ण करणारा बॅट्समन ठरणार आहे. आता विराट केवळ सचिनच्या रेकॉर्डच्यामागे आहे. 



सचिनने आपल्या करियरमध्ये १०० आंतरराष्ट्रीय शतक लगावले आहेत. ज्यामध्ये ५१ टेस्ट आणि ४९ वनडे शतक आहेत. कोहली सचिनच्या रेकॉर्डजवळ जाऊन पोहोचलाय. कोहलीच्यानावे वनडेमध्ये ४३ शतक आहेत. 


याआधी देखील विराट कोहलीने सचिनचा एक रेकॉर्ड तोडलाय. विराट वनडेमध्ये जलद १० हजार रन्स पूर्ण करणारा बॅट्समन बनलाय. कोहलीने २१३ वनडे मॅचमधील २०५ खेळांमध्ये हा स्कोअर केलाय. तर सचिनने २५९ खेळींमध्ये १० हजार रन्स बनवले होते.