PHOTO : प्रभूदेवासाठी ख्रिश्चन धर्म सोडून केला होता हिंदू धर्माचा स्विकार; 100 कोटींचा बंगला, प्रायव्हेट जेट असणारी ही अभिनेत्री कोण?

Nayanthara Birthday : या फोटोमधील चिमुकली ही साऊथमधील सर्वात हॉट अभिनेत्री असून गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे. या अभिनेत्रीचा 18 नोव्हेंबरला 39 व्या वाढदिवस आहे. 

| Nov 18, 2024, 17:34 PM IST
1/12

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा सौंदर्य आणि संपत्तीच्या बाबतीत त्यांनी बॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकलंय. आम्ही ज्या सौंदर्याबद्दल बोलत आहोत, तिचे नाव साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. 

2/12

ही अभिनेत्री आहे जिचा जन्म बंगळुरुमध्ये ख्रिश्चन कुटुंबात झाला. तिचं खरं नाव डायना मरियम कुरियन आहे. तिचे वडील कोदियात्तु एअरफोर्समध्ये होते. आम्ही बोलत आहोत, शाहरुख खानची अभिनेत्री नयनताराबद्दल बोलत आहोत. 

3/12

नयनतारा साऊथमधील सध्याच्या घडीची सर्वात महागडी स्टार आहे. ही अभिनेत्री 2008 मध्ये अॅक्टर, डायरेक्टर, डान्सर प्रभुदेवाच्या प्रेमात पडली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्विकारला होता.  2010 मध्ये प्रभुदेवाची पत्नी लताने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यात आरोप केला होता की प्रभुदेवा, नयनतारासोबत लिव-इनमध्ये राहात आहे. त्यानंतर लताने धमकी दिली होती, की प्रभुदेवाने नयनतारासोबत लग्न केले तर ती उपोषण करेल. 

4/12

नयनतारासोबत अफेअर सुरु झाल्यानंतर प्रभुदेवाना त्याचे 16 वर्षे जुने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. जुलै 2011 मध्ये प्रभुदेवाना त्याची पत्नी लताला घटस्फोट दिला. पण 2012 मध्ये प्रभुदेवाने नयनताराशी संबंध तोडले. 

5/12

नयनतारा तिच्या हॉट भूमिकांसाठी प्रसिद्ध होती, त्यासोबतच अॅक्टर सिंबूसोबत लिपलॉकचा एक फोटो वादग्रस्त ठरला होता. या फोटोसाठी नयनतारा आणि सिंबूला माफी मागण्याचीही मागणी करण्यात आली होती. 

6/12

2009 मध्ये नयनतारा केरळमधील ओट्टापालम येथील अम्मान मंदिरात साडी ऐवजी सलवार सुटमध्ये पोहोचली होती. साडी नेसली नसल्यामुळे प्रशासनासह भक्तांनी नयनताराला मंदिरात प्रवेश नाकारला होता. या घटनेनंतर लोकांनी नयनताराला एक बॉक्स भरुन साड्या पाठवल्या होत्या.

7/12

2007 मध्ये प्रदर्शित बिल्ला चित्रपटानंतर नयनताराचा किस्मतचा सितारा चमकला. त्यानंतर तिने डझनभर हिट फिल्म दिल्या होत्या. आता तिचं नाव साऊथच्या सर्वात हॉट अॅक्ट्रेसमध्ये घेतलं जातं .

8/12

2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. तिच्या 'नयनतारा - बियॉन्ड द फेयरीटेल' या माहितीपटामुळे चर्चेत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा माहितीपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

9/12

नयनतारा पती विघ्नेश शिवन आणि मुलांसह मुंबईत 4 बेडरूमच्या आलिशान बंगल्यात राहते. सिनेमा हॉल, स्विमिंग पूल आणि जिनसारख्या सुविधा असलेल्या या घराची किंमत 100 कोटी रुपये आहे. याशिवाय नयनताराचे बंजारा हिल्स आणि हैदराबादमध्ये दोन अपार्टमेंट आहेत ज्यांची किंमत 30 कोटी रुपये आहे.

10/12

'जवान' अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचेही अप्रतिम कलेक्शन आहे. यामध्ये BMW 5 Series, Mercedes GLS 350d, Toyota Innova Crysta, Ford Endeavour आणि BMW 7 सिरीज सारख्या कारचा समावेश आहे. इतकेच नाही तर नयनतारा ही त्या बड्या सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांच्याकडे प्रायव्हेट जेट आहे. त्याची किंमत 50 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

11/12

नयनतारा पती विघ्नेश शिवनसोबत स्वतःचे प्रोडक्शन हाऊसही चालवते. त्याचं नाव राउडी पिक्चर्स आहे, ज्यातून अभिनेत्रीने 50 कोटींचा नफा कमावला आहे. या सर्व गोष्टींसह नयनताराची एकूण संपत्ती 200 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातं.

12/12

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, नयनताराने 9 जून 2022 रोजी चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश शिवनशी लग्न केलं. या जोडप्याला उर रुद्रोनिल एन शिवन आणि उलग धैवाग एन शिवन अशी जुळी मुलं आहेत.