मुंबई : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सन २००३ मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमनच्या २९ शतकांचा रेकॉर्ड तोडला. यानंतर फिएट मोटर्सने सचिनला फेरारी मोडेना ३६० कार गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर पोहोचली तेव्हा फॉर्मुला वन ड्रायव्हर मायकल शूमाकरने मुलाखतीदरम्यान ही कार गिफ्ट केली. त्यावेळेस या कारची किंमत ७५ लाख रुपये होती.


सचिनची विनंती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार तर मिळाली पण ती भारतात आणायची कशी ? कारण इंग्लंडहून ही कार भारतात आणण्यासाठी त्याला १२० टक्के म्हणजे साधारण १.१ कोटी रुपये कस्टम, इंपोर्ट, आणि एक्साईज ड्यूटी द्यावी लागणार होती. गिफ्टमध्ये मिळालेल्या कारच्या किंमतीपेक्षा जास्त कर द्यावे लागणार असल्याचं लक्षात आल्यावर सचिनने भरत सरकारला कारची ड्युटी माफ करण्याची विनंती केली. 


चहुबाजूने टीका 


त्यावेळी एनडीएचं सरकार होतं आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी होते. अटलजींनी सचिनचे अपील स्वीकारत कारवरील कर माफ करण्याची घोषणा केली.


सरकारच्या या घोषणेनंतर चहुबाजूने टीका करण्यात आली. एका व्यक्तीसाठी सरकार दोन मापदंड कशी लावू शकते ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलां.


कोणत्या स्पर्धेसाठी बक्षीस मिळालं नसताना एका व्यक्तीसाठी नियमात सवलत देण कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारण्यात आला. पण वाजपेयी सरकारने आपला निर्णय बदलला नाही.