भारतीय रणरागिणी कडाडल्या! महिला टीम इंडियाने घेतला बदला, पाकिस्तानचा उडवला धुव्वा
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तान टीमचा धुव्वा उडवलाय.
न्यूझीलंड : अखेर भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकपमधील बदला घेतलाच. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तान टीमचा धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने पाकिस्तान टीमचा 107 रन्सने परवाभव केला आहे.
महिला टीम इंडियाने पाकिस्तानला 245 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना 137 रन्समध्ये पाकिस्तान टीमला गारद केलं. यामध्ये गोलंदाज राजेश्वरी गायकवाडला 4 विकेट्स मिळाल्या आहेत. तर झुलन गोस्वामी आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळाल्या आहेत.
पाकिस्तानकडून सिद्रा अमीन हिने सर्वाधिक म्हणजेच 30 रन्स केले. कर्णधार बिस्माह मारूफही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली. अवघ्या 15 धावांमध्ये ती माघारी पतरली.
दरम्यान फलंदाजी करताना महिलांच्या टीम इंडियाची सुरुवात काही खास झाली नाही. शेफाली वर्माच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. शेफाली अवघ्या 4 रन्सवर आऊट झाली.
तीन जणींनी झळकावलं अर्धशतक
टीम इंडिया कठीण परिस्थितीत असताना स्मृतीने डाव सांभाळला. स्मृतीने 75 बॉलमध्ये 52 रन्स करत टीमला चांगला स्कोर उभारण्यात मदत केली. यानंतर पूजा वस्त्रकार आणि स्नेह राणा यांनी टीम इंडियाच्या डावाची कमान सांभाळली. दोघींनीही उत्तम अर्धशतकं झळकवत स्कोर 200 पार नेला.