मुंबईत अशी सुरू आहे दिवाळीची तयारी
दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी बाजारात दिसून आली. पणत्या, रांगोळी, लायटिंग, कंदील, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची लगबग बाजारात आहे.
मुंबई : दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी बाजारात दिसून आली. पणत्या, रांगोळी, लायटिंग, कंदील, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची लगबग बाजारात आहे.
रेडीमेड रांगोळीचा साचा वापरण्याची मोठी क्रेझ सध्या आहे. त्यामुळे विविध डिझाईन्समध्ये रांगोळी साचा उपलब्ध आहेत. रांगोळीतही अनेक रंग नव्याने आलेत. पणत्यांमध्येही बरीच व्हरायटी असून हल्ली आकर्षक डिझाईनमधल्या कँडल्सही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जाताहेत. तरुणवर्गही आपल्या आवडीचे कंदील, सजावटीचे साहित्या घेण्यासाठी बाहेर पडलेला दिसून येत आहे.
दरम्यान मिठाईच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झालीय. यंदा अनेक गोष्टींवर जीएसटी लागू झाल्यानं किमतींमध्येही १० ते २० टक्क्यांनी वाढ झालीय.