नवी दिल्ली : असं म्हणतात की, हातावरील रेषा भविष्य सांगतात. भविष्यातील अशा घटनांचे संकेत देतात की, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. याशिवाय हस्तरेषा शास्त्रच्या माध्यमातून हे सुद्धा जाणून घेता येते की, व्यक्तीने कोणत्या क्षेत्रात करिअर (Career) बनवायला हवे. कोणत्या क्षेत्रात यश मिळू शकते? यासाठी मुख्यतः हाताच्या वेगवेगळ्या रेषांची स्थिती महत्वाची असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हातावरील रेषांनी ओळखा तुमचे करिअर


जर हातावर चंद्र निर्माण झाला आहे, तर कला, लेखन, पत्रकारिता, साहित्य सारख्या क्षेत्रात व्यक्तीला यशस्वी करिअर करता येईल.


जर मंगळ, सुर्य आणि बुध पर्वत चांगल्याप्रकारे उभारले आहेत, तर अशी व्यक्ती चिकित्सा क्षेत्रात यशस्वी होऊ शकते.


जर हातावर सुर्य पर्वत पूर्ण विकसित असतील तर, व्यक्तीला सरकारी नोकरी मिळू शकते किंवा व्यवसाय केल्यास सरकारी कामे मिळवून यशस्वी करिअर करू शकतो.


शुक्र पर्वताची स्थिती चांगली असल्यास व्यक्ती फॅशन- ग्लॅमर क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. या क्षेत्रातील लोक व्यवसायात खूप पैसे कमावतात.


मणिबंधातून निघून एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा सरळ शनी पर्वतापर्यंत गेल्यास तो व्यक्ती मोठा अधिकारी बनू शकतो. किंवा मोठी सन्मानित व्यक्ती बनू शकते.


------------


(वरील माहिती सामान्य मान्यतांच्या आधारे देण्यात आली आहे. Zee24Taas याची खात्री देत नाही. )