देवीच्या नैवेद्यासाठी बनवा गाजराचा हलवा; खवा न घालता 10 मिनिटात होणारी रेसिपी

मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी देवीच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवले जाते. थंडीच्या या हंगामात गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. अशावेळी गाजर हलवा केला जातो. मात्र, वेळखाऊ रेसिपी असल्याने गृहिणी कधी कधी कंटाळा करतात. आज आम्ही तुम्हाला सोप्पी रेसिपी सांगणार आहोत.

| Dec 19, 2024, 14:28 PM IST

मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी देवीच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवले जाते. थंडीच्या या हंगामात गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. अशावेळी गाजर हलवा केला जातो. मात्र, वेळखाऊ रेसिपी असल्याने गृहिणी कधी कधी कंटाळा करतात. आज आम्ही तुम्हाला सोप्पी रेसिपी सांगणार आहोत.

1/7

देवीच्या नैवेद्यासाठी बनवा गाजराचा हलवा; खवा न घालता 10 मिनिटात होणारी रेसिपी

 Tips To Make That Perfect Gajar Halwa at home

 मावा किंवा कन्डेस्ड मिल्क न वापरता आज आम्ही तुम्हाला गाजर हलवा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. फक्त दूध आणि साखर वापरुन अवघ्या 10 ते 15 मिनिटांत हलवा तयार होईल.   

2/7

साहित्य

गाजर, अर्धा कप साखर, अर्धा कप दूध, वेलची पूड, तूप, दुधाची साय, ड्रायफ्रुट्स

3/7

कृती

सगळ्यात पहिले गाजर किसून घ्या. गाजर किसून झाल्यानंतर एका भांड्यात तूप घेऊन थोडे गरम झाल्यानंतर त्यात गाजराचा किस घालावा गाजर मऊ होईपर्यंत चांगले शिजवून घ्या. 

4/7

गाजर चांगले शिजवून घेतल्यानंतर त्यात आता साखर घालावी आणि मध्यम आचेवर चांगले शिजवून घ्यावे. 

5/7

 साखरेला पाणी सुटल्यानंतर त्यातील पाणी थोडे सुकू द्यावे त्यानंतर त्यात दूध टाकावे आणि ड्रायफ्रुटचे तुकडे घालावे

6/7

गाजराचा हलवा सुकत आल्यानंतर त्यात साय किंवा मिल्क पावडर घालून शिजवून घ्या. 

7/7

गाजराचा हलवा थोडा कोरडा झाल्यानंतर त्यात वेलची पूड घालून एका डिशमध्ये सर्व्ह करा