Sawai Result 2024 : वर्षांची सुरुवात नाट्यप्रेमींसाठी नेहमीच खास असते, निमित्त असतं ते सवाई एकांकिका स्पर्धेचं. चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई एकांकिका 2024 या स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयाची 'एकूण पट एक' ही यंदाची सवाई एकांकिका ठरली आहे. तर द्वितीय क्रमांक गुरुनानक खालसा महाविद्यालयाच्या  'लोकल पार्लर' या एकांकिकेने पटकावला. मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्यगृहात एकांकीका स्पर्धा पार पडली. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणाऱ्या या स्पर्धेचं यंदाचं हे 35 वं वर्ष होतं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत एकूण 7 एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या. एकांकिकामधून सर्वोत्तम एकांकिकेची निवड करण्यासाठी अद्वैत दादरकर, मिलिंद शिंदे ,प्रवीण तरडे  हे सवाई परीक्षक होते.


15 वर्षानंतर जिंकली सवाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वझे -केळकर महाविद्यालयाने यंदाच्या सवाई चषकावर नाव कोरलं असून, सवाई दिग्दर्शक आणि सवाई लेखकचा मानही मिळवला. विशेष म्हणजे तब्बल 15 वर्षांनी वझे - केळकर महाविद्यालय सवाई एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीस पात्र ठरले आणि त्याचबरोबर सवाईचे मानकरी ठरले. 


अंतिम फेरीतील 7 एकांकिका कोणत्या?


चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई एकांकिका 2024 या स्पर्धेत यावर्षी पुढील एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या 


1) एकूण पट एक (विनायक गणेश वझे स्वा. महाविद्यालय, मुलुंड) 
2)  लोकल पार्लर (गुरुनानक खालसा स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा) 
3) फ्लाईंग राणी  (कलामंथन, ठाणे) 
4) उणिवांची गोष्ट (सतिश प्रधान ज्ञानसाधना विद्यालय, ठाणे) 
5) पडदा (नाट्यपरिवार, ठाणे) 
6) पुंडलिका भेटी (महर्षी दयानंद महाविद्यालय, ठाणे) 
7)  हॅलो इन्सपेक्टर (रेवन एटंरटेंनमेंट, पुणे) 


कोणाला मिळाला कोणता पुरस्कार?


सवाई एकांकिका स्पर्धा ही राज्यभरातल्या केवळ प्रथम पारितोषिक विजेत्यांची स्पर्धा असते. या स्पर्धेमुळे मुंबईबाहेरच्या कलाकारांना मुंबईत आपली कला सादर करण्याची संधी मिळते. आज कलाविश्वात अनेक कलाकारांनी या मंचावर आपलं नाव कोरलं आहे. सवाई दिग्दर्शक, सवाई लेखक ,नेपथ्य ,प्रकाशयोजना या विभागातील पुरस्कारावर कुणी बाजी मारली हे पाहुया.


 • सवाई प्रथम - चतुरंग प्रतिष्ठान पुरस्कृत- एकूण पट एक (विनायक गणेश वझे स्वा. महाविद्यालय, मुलुंड) 
 • सवाई द्वितीय - लोकल पार्लर (गुरुनानक खालसा स्वायत्त महाविद्यालय) 
 • सवाई लेखक- सिद्धेश साळवी (एकूण पट एक) 
 • सवाई दिग्दर्शक- अमित पाटील -  सिद्धेश साळवी (एकूण पट एक) 
 • सवाई अभिनेता- साहिल चव्हाण  (पुंडलिका भेटी) 
 • सवाई अभिनेत्री- निकिता घाग (फ्लाईंग राणी) 
 • सवाई प्रकाश योजनाकार- श्याम चव्हाण  (पुंडलिका भेटी) 
 •सवाई नेपथ्यकार - साहिल पवार (लोकल पार्लर) 
 •सवाई प्रेक्षक पसंती एकांकिका- हॅलो इन्सपेक्टर