सूर्यास्त झाला, अंधार पडला, आता थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार; जगातील आश्चर्यकारक ठिकाण
जगातील या ठिकाणी आता रात्र झाली असून थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार आहे.
No sunrise in this US town in Alaska for 64 days : दिवस आणि रात्र या वेळापत्रकानुसारच संपूर्ण जग चालते. उगवत्या सूर्याबरोबर प्रत्येकजण उर्जेने कामाची सुरुवात करतात. दिवस मावळल्यावर रात्रीची वेळ ही विश्रांतीची असते. मात्र, जगात एक असे आश्चर्यकारक ठिकाण आहे जिथे दोन महिने दिवस आणि दोन महिने रात्र असते. सध्य येथे सूर्यास्त झाला असून अंधार पडला आहे. म्हणजेच येथे रात्र सुरु झाली आहे. आता येथे थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार आहे.