मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपता संपत नाही. १६ जूनपासून ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पार्ट दोन सुरु झाला. पण तेव्हापासून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. आज सलग पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच यावर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि स्पोर्ट्सचे अतिरिक्त गुण देण्यात आलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढलीय त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जात कॉलेजांच्या पर्यायासाठी निवड केलीय. 


पण आता ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत निकाल पत्रात विद्यार्थ्यांना देण्यात आलेले अतिरिक्त गुण दाखवले जात नसल्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. शिवाय आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासून ऑनलाइन प्रक्रीया ठप्प आहे.