पार्ट टाईम जॉबचे हे आहेत ५ ऑप्शन
मोठ्या शहरांतील चकचकीत लाईफस्टाईलमुळे लोकांच्या गरजा दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. यातच तुमचा खर्च जर इनकमपेक्षा अधिक असेल तर तुमच्यासाठी पार्ट टाईम जॉबचा चांगला ऑप्शन आहे. ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त तुम्ही रिकाम्या वेळेत काही तास काम करुन चांगले पैसे मिळवू शकता. हे आहेत पार्ट टाईम जॉबचे काही ऑप्शन्स...
मुंबई : मोठ्या शहरांतील चकचकीत लाईफस्टाईलमुळे लोकांच्या गरजा दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. यातच तुमचा खर्च जर इनकमपेक्षा अधिक असेल तर तुमच्यासाठी पार्ट टाईम जॉबचा चांगला ऑप्शन आहे. ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त तुम्ही रिकाम्या वेळेत काही तास काम करुन चांगले पैसे मिळवू शकता. हे आहेत पार्ट टाईम जॉबचे काही ऑप्शन्स...
सॉफ्टवेअर डेव्हलपर
यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअरव फिल्डसाठीचे प्रोगामिंग येणे गरजेचे आहे. सध्या सॉफ्टवेअर डेव्हलपरची मार्केटमध्ये पार्ट टाईम आणि प्रोजेक्ट बेसवर काम करण्याऱ्यांची मोठी मागणी आहे. यात तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलप करणे, नवी अॅप बनवणे आणि नवी वेबसाईट डेव्हलप करणे यासारखी कामे करावी लागतात. यातून तुम्ही प्रति तास १५०० ते २००० रुपये कमवू शकता.
फ्रीलान्स फोटोग्राफर
यासाठी तुमच्याकडे फोटोग्राफी, फोटोशॉप आणि ग्राफिक डिझायनिंगचे स्किल आणि त्यासंबंधित टूल्सचा वापर करता येणे गरजेचे आहे. यात कंपन्या, संस्था, न्यूज पेपर, मॅगॅझिन, वेबसाईट वा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी फोटोग्राफी करावी लागते. याशिवाय फोटो व्हिडीओही तयार करावे लागतात. या पार्ट टाईम जॉबमधून तुम्ही प्रति तास १४०० रुपये कमवू शकता.
कॉपी एडिटर/रायटर
या जॉबसाठी तुम्हाला कॉपी एडिटिंग तसेच रायटिंग स्किल असणे गरजेचे आहे. याशिवाय स्टाईल शीटवरही काम करता आले पाहिजे. यामध्ये तुम्हाला कंटेट अथवा कॉपी एडिट करणे. त्यातील व्याकरणाच्या चुका सुधारणे यासारखी कामे करावी लागतात. या जॉबसाठी तुम्हाला प्रतितास ११०० रुपये मिळू शकतात.
ट्रॉस्टक्रिप्ट प्रोसेसर
यासाठी कम्प्युटरचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे. यात डेटा कलेक्शन आणि त्या डेटाला सिस्टेमॅटिक बनवण्याचे काम असते. असाईनमेंटमध्ये टाईम, स्पीड आणि अचूकतेवरही लक्ष देणे गरजेचे असते. या जॉबसाठी तुम्हाला प्रति तास १००० रुपये मिळू शकतात.
सोशल मीडिया असिस्टंट
या जॉबसाठी तुम्हाला इंटरनेट अथवा सोशल मीडिया चॅनेल्स उदाहरणार्थ फेसबुक, ट्विटर, लिंकेडिन, यूट्यूब यांचा वापर करता येणे गरजेचे आहे. यात तुम्हाला एखादी कंपनी, संस्था, वेबसाईट, न्यूजपेपरसाठी काम करावे लागते. या जॉबद्वारे तुम्ही १४०० रुपये प्रति तास कमवू शकता.