नवी दिल्ली : थेंबे थेंबे तळे साचे, अशी आपल्याकडे म्हण आहे. त्यामुळे बचतीची सवय ही लावायलाच हवी. कारण गरजेच्या वेळी हीच जमापुंजी कामी येते. सध्याच्या वाढत्या महागाईत बचत कशी करावी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित कसे रहावे, यासाठी काही टिप्स...


प्रत्येक महिन्याला बचत कशी कराल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बचत करण्यापूर्वी आपण बचत करताना ज्या लहान लहान चुका करतो, हे सर्वप्रथम जाणून घेणे गरजेचे आहे. आपण खर्च केल्यानंतर जी रक्कम उरते, त्यात सेव्हींग करण्याचा प्रयत्न करतो. मात्र हा बचतीचा योग्य पर्याय नाही. कारण यात बचतीची शक्यता कमी होते. तर वर्तमानातील खर्च आणि भविष्यातील बचत याचा ताळमेळ साधा. 


तुमचे ध्येय धरवा


बचत करण्यापूर्वी तुमचे लक्ष्य ठरवा. त्यामुळे ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही अतिरिक्त खर्च करणार नाही. 


प्राधान्यक्रम ठरवा


आपल्या गरजा न संपणाऱ्या आहेत. आणि त्या पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. अनेकदा आपण आपल्या मिळकतीपेक्षा अधिक खर्च करतो. अशा वेळी तुमचा प्राधान्यक्रम ठरवा. त्यामुळे अनावश्यक खर्च तुम्ही टाळू शकता. 


छोटी बचत योजना


साधारणपणे मिळकीतीच्या १० ते २५ % बचत करायला हवी. मात्र हे प्रमाण काही ठरलेले नाही. तुम्ही तुमचे लक्ष्य ठरवून हे प्रमाण कमी अधिक करू शकता. 
त्यानुसार प्लॅनिंग करून बचत करा.


बचतीवर रिटर्नस


बचत आणि इंव्हेस्टमेंटमध्ये फरक ओळखणे गरजेचे आहे. बचत आपत्कालीन आणि भविष्यातील खर्चासाठी केली जाते. तर इंव्हेस्टमेंट वृद्धकाळासाठी आणि दीर्घ कालीन उद्दीष्ट साध्य करण्यासाठी केली जाते. त्यामुळे सर्वात आधी तुमचे लक्ष्य ठरवा. त्यानंतर इंव्हेस्टमेंटचे फायदे-तोटे समजून घ्या. कारण आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे.