स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक न करता या ५ प्रकारे करा मोठी कमाई
अनेक लोक स्टॉक मार्केटमधील वेगवेगळ्या रिस्कमुळे यात पैसे गुंतवण्यासाठी घाबरतात. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि ट्रेड करण्यासाठी तुमच्याकडे तसे स्किल्स असणे गरजेचे आहे.
नवी दिल्ली : अनेक लोक स्टॉक मार्केटमधील वेगवेगळ्या रिस्कमुळे यात पैसे गुंतवण्यासाठी घाबरतात. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि ट्रेड करण्यासाठी तुमच्याकडे तसे स्किल्स असणे गरजेचे आहे.
पण तुमच्याकडे तुमचं हिडन टॅलेंट दाखवण्यासाठी पैसे नसतील, तरीही चिंता करण्याची गरज नाही. स्टॉक मार्केट रिलेटेड असे अनेक बिझनेस आणि कामं आहेत, ज्याद्वारे तुम्ही चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची काहीच गरज नाहीये. फक्त तुम्हाला एक आवडता मार्ग निवडायचा आहे. याच संबंधातील ५ मुद्दे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
ब्रोकर बना -
जास्तीत जास्त लोक हे स्टॉक मार्केटमध्ये ब्रोकरच्या मदतीने गुंतवणूक करतात. ब्रोकींग हाऊस उघडणे प्रत्येकाला परवडणारे नाहीये. त्यामुळे तुम्ही एखाद्या ब्रोकींग हाऊसचे सब ब्रोकर बनू शकता. असे करून तुम्ही महिन्याला चांगली कमाई करू शकता. तशी तर ही कमाई क्लाएंटवर डिपेन्ड आहे. पण जर क्लाएंट मोठे असतील तर ही कमाई लाखोंच्या घरात जाऊ शकते. सब ब्रोकर्सना ब्रोकींग हाऊसकडून चांगलं कमिशन दिलं जातं. सब ब्रोकर होण्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा सर्टिफिकेट कोर्स करावा लागेल.
डिमॅट अकाऊंट ओपन करण्याचं काम -
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणे गरजेचे आहे. जनरली ब्रोकींग हाऊस किंवा बॅंक डिमॅट अकाऊंट उघडून देतात. पण, तुम्ही ब्रोकींग हाऊस किंवा बॅंकसोबत संपर्क करून हे काम सुरू करू शकता. हे काम पार्ट टाईमही केलं जाऊ शकतं. एक डिमॅट अकाऊंट उघडण्यासाठी २०० ते ५०० रूपये मिळतात.
म्युचुअल फंडचे प्रोफेशनल मेंबर बना -
स्टॉक मार्केटमध्ये पैसे न गुंतवता कमाई करण्याचा हा सर्वात चांगला पर्याय आहे. म्युचुअल फंड्स किंवा इन्व्हेस्टमेंट फर्म्स सर्वात मोठ्या इन्व्हेस्टर आहेत. या संस्थांकडे अनेक मोठे प्रोफेशनल मेंबर्स असतात, जे तुमचा पोर्टफोलिओ ट्रॅक आणि अॅनलाईझ करतात. जर तुम्ही एक प्रसिद्ध स्टॉक ब्रोकर आहात किंवा इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर आहात तर या पोझिशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता.
रेप्युटेड साईट्ससाठी ब्लॉग लिहा -
तुम्ही शेअर बाजार विषयी ट्रेडिंग टिप्स किंवा आयडिया देण्याला सुरूवात करू शकता. आर्थिक उलाढालीवरही लिहू शकता. तुम्ही स्वत:ही एक वेबसाईट लॉन्च करू शकता किंवा दुस-या वेबसाईटसाठी लिखाण करू शकता. या दोन्हींच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्हॅल्युएबल फायनॅन्शिअल अॅडव्हाईझमधून कमाई करू शकता.
नवीन ट्रेडिंग स्किल डेव्हलप करा -
पैसे न गुंतवता शेअर बाजारातून कमाई करण्याचा हा प्रकार अनोखा आहे. काही लोकांकडे एखादं काम दुस-या पद्धतीने करण्याची क्षमता असते. जर तुमच्यात हे स्किल असेल तर तुम्ही नवीन ट्रेडिंग स्किल डेव्हलप करू शकता. तुम्ही पेड सॉफ्टवेअर लॉन्च करू शकता, जे पोटेंशिअल स्टॉकना ट्रेस करेल.