..अन् माकड शशी थरुर यांच्या मांडीवरच झोपलं; गोंडस फोटोंवर हटणार नाही नजर

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी बुधवारी सकाळी गार्डनमध्ये अचानक माकडासह झालेल्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.   

| Dec 04, 2024, 20:35 PM IST

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी बुधवारी सकाळी गार्डनमध्ये अचानक माकडासह झालेल्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. 

 

1/8

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी माकडासह झालेल्या भेटीचा एक अनुभव शेअर केला आहे.   

2/8

आपल्या गार्डनमध्ये पहाटेचा आनंद घेत वर्तमानपत्र वाचत असताना यावेळी अचानक एक माकड तिथे पोहोचलं.   

3/8

शशी थरुर यांनी एक्सवर फोटो शेअर केले आहेत.   

4/8

शशी थरुर पेपर वाचत असताना एक माकड गार्डनमध्ये आलं आणि अजिबात न घाबरता त्यांच्या मांडीवर जाऊ बसलं. भुकेलं असल्याने त्याने केळीही खाल्ली.   

5/8

थरुर यांनी सांगितलं की, माकडाने मला मिठी मारली आणि माझ्या छातीवर डोके ठेवून झोपी गेले. त्यांनी हळूवारपणे उठण्याचा प्रयत्न करताच, माकड उडी मारून पळून गेलं.   

6/8

शशी थरुर यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये माकड निर्धास्तपणे बसलेलं आणि आराम करताना दिसत आहे.   

7/8

“वन्यजीवांबद्दल आदर आमच्यात रुजला आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे. माकड चावा घेण्याची जोखीम असतानाही, ज्यासाठी रेबीजचे इंजेक्शन लागले असते, ते शांत राहिले आणि स्वागत केलं.  

8/8

"माझा विश्वास खरा झाला याबद्दल मी समाधानी आहे आणि आमची भेट पूर्णपणे शांत आणि सौम्य होती," असं त्यांनी सांगितलं आहे.