मुंबई : ११ वीच्या प्रवेशाच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्यावर आज विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरु झाली आहे. मुंबई आणि पुण्यात कट ऑफच्या याद्यांमध्ये टक्केवारी काहीशी घरसली आहे. नाशिक शहरात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी विद्यार्थी पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यंदा पहिल्यांदा ऑनलाइन प्रक्रिया असल्यानं वेबसाईट हँग होण्याचे प्रमाण जास्त होते. कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार याचा एसएमएस दहा तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यन्त मिळणे अपेक्षित असताना रात्री उशीरापर्यंत मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता पासून प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. शहरात एकूण 24 हजार 600 जागा आहेत. पहिल्या फेरीत मेरिट लिस्ट ने उच्चांक गाठला असून आर वाय के महाविद्यालयात 94.4 टक्यावर मेरिट लिस्ट बंद झालीय. तर के टी एच एम महाविद्यालयात 91 टक्के आहे. वाणिज्य शाखेच्या बाबतीत ही बी वाय के महाविद्यालयात 90 /91 टक्के असताना. इतर महाविद्यालयात 81 ते 85 टक्के कटऑफ लिस्ट लागली आहे. ज्या विद्यार्थीचे पहिल्या यादीत नाव आहे त्यांनी प्रवेश घेणं बंधनकारक आहे.