हैदराबाद - इंजिनिअरींग कॉलेजची निवड करताना अनेक विद्यार्थी प्लेसमेंटसाठी कोणत्या कंपन्या तेथे येतात? या एका महत्त्वाच्या निकषावरूनही कॉलेजची निवड करतात. यापूर्वी भारतामध्ये 'गूगल', ' मायक्रोसॉफ्ट' अशा जगातील अग्रगण्य कंपन्या  भारतीय मुलांना जॉब ऑफर देण्यासाठी आल्या आहेत. लवकरच 'अ‍ॅपल' भारतीय मुलांना जॉब ऑफर देण्यासाठी भारतामध्ये येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (IIIT-H)येथे कॉलेज प्लेसमेंटसाठी 'अ‍ॅपल' पहिल्यांदा भारतात दाखल होणार आहेत.  'नेमके कोणत्या प्रोफाईलसाठी अ‍ॅपल विद्यार्थ्यांना निवडणार आहेत हे अजूनही स्पष्ट झाले नसले तरीही विद्यार्थ्यांना आपली स्किल्स कंपनीसमोर मांडण्याची ही सुवर्णसंधी आहे. असे (IIIT-H)च्या कॅम्पस प्लेसमेंट हेड टी.वी.देवी प्रसाद यांनी सांगितले आहे. 


डिसेंबरमध्ये सुरू होणार्‍या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी यंदा ३५०  बीटेक, बी ई, मेक टेक, एमएससी रिसर्चच्या मुलांनी नोंदणी केली आहे.मोबाईल कम्युनिकेशनमध्ये 2 डी आणि 3 डी ग्राफिकचे ज्ञान असलेल्या तरूणांना सध्या खूप मागणी असल्याची माहिती देवी यांनी दिली आहे.