सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल आज जाहीर होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल आज जाहीर होणार आहे
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज संध्याकाळी ४ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षा ५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेकरिता १६ लाख, ३८ हजार, ४२८ विद्यार्थी बसले होते. यंदा दहावीची परीक्षा काहीशा गोंधळताचं पार पडली होती.
दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि झारखंड येथे गणिताचा पेपर फुटल्यानंतर परीक्षा पुन्हा घ्यावी की नाही यावर वादंग झाला होता. अखेर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का किती वाढतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलंय.
या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकता.
cbseresults.nic.in
cbse.nic.in