मुंबई : सीबीएसई पेपरफुटीच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली. कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका, असं आवाहन त्यांनी पालकांना केले. त्यानंतर शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी बारावीचा पेपर होणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, राज यांच्या इशाऱ्यानंतर सीबीएसई पेपर महाराष्ट्रात होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. दिल्ली आणि हरियाणात पेपर होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख जाहीर केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा २५ एप्रिलला होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, दहावीच्या गणित विषयाबाबत केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून १५ दिवसांत फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरियाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 



देशाच्या बाहेर पेपर लीक झाला नाही, त्यामुळे देशाबाहेरील विद्यार्थ्यांची फेर परीक्षा होणार  नसल्याचेही त्यांनी सांगितले. सीबीएसईच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान,  तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, अशी ग्वाही देणारं परिपत्रक राज ठाकरेंनी काढले होते. त्यामुळे परिक्षासंदर्भात जोरदार चर्चा सुरु झालेय.