नवी दिल्ली : गुरुग्राममधील भोंडसी या ठिकाणी असलेल्या रायन इंटरनॅशल स्कूलला सीबीएसई बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) 'कारणे दाखवा' नोटीस पाठवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८ सप्टेंबरला याच शाळेत प्रद्युमन ठाकूरची हत्या झाली होती. शाळेच्या स्वच्छतागृहात त्याचा मृतदेह आढळून आला होता. याच प्रकरणी आता सीबीएसई बोर्डाने स्पष्टीकरण मागितले आहे. 


 गुरुग्रामच्या शाळेत प्रद्युमन हत्या प्रकरण घडल्यानंतर सीबीएसई बोर्डाने द्विसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने दिलेल्या अहवालानंतरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.



सुरक्षेचे योग्य निकष का बाळगले नाही, हा प्रश्नही विचारण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत शाळा प्रशासनाने या नोटिशीला उत्तर द्यायचे आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिलेय.


रायन इंटरनॅशनल स्कूलकडून आम्ही पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीला काय उत्तर येते त्यावरून आम्ही आमची पुढची कारवाई ठरवणार आहोत, असे सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेय.