नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या(सीबीएसई) १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या परीक्षा ५ मार्च २०१८ पासून सुरू होणार आहेत. बोर्डाकडून बुधवारी रात्री परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं. 


किती वाजता सुरू होईल परीक्षा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी १२वी आणि १०वीचे एकूण २८.२४ लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी बोर्ड परीक्षा देतील. यात १२वीच्या ११.८६ लाख विद्यार्थ्यांचा आणि १०वीच्या १६.३८ लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोन्ही विभागांच्या परीक्षा सकाळी १०.३० वाजता सुरू होतील. सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा १२ एप्रिल २०१८ पर्यंत चालतील. तर १०वीच्या परीक्षा ४ एप्रिल २०१८ ला संपतील. 


१२व्या वर्गासाठी इंग्रजीची परीक्षा आधी


सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षांची सुरूवात इंग्रजीच्या पेपरने होणार आहे. ५ मार्चला तारखेला हा पेपर होईल. तर त्यानंतर ७ मार्चला भौतिक शास्त्राचा पेपर होईल. ९ मार्चला बिझनेस स्टडीजचा पेपर असेल. १३ मार्चला केमिस्ट्रीचा पेपर असेल. १५ मार्चला अकाऊंट्न्सी, १७ ला भूगोल, २० ला इतिहास, २१ ला गणित, २३ इन्फॉर्मॅटीक अ‍ॅन्ड कम्प्युटर सायन्स, २६ मार्चला अर्थशास्त्र, २७ मार्चला जीवशास्त्र, २ एप्रिलला हिंदी कोर, ५ एप्रिलला मनोविज्ञान, ९ एप्रिलला शारिरीक शिक्षण, १० एप्रिलला समाजशास्त्र, १२ एप्रिलला होम सायन्सचा पेपर असेल. 


१०वीचा पहिला पेपर बॅंकिंग आणि इन्शुरन्स


१०वीच्या विद्यार्थ्यांना ५ मार्चला बॅंकिंग आणि इंन्शुरन्सचा पेपर द्यावा लागेल. त्यानंतर ६ मार्चला हिंदी, १२ मार्चला इंग्रजी, १६ मार्चला विज्ञान, २२ मार्चला सामाजिक विज्ञान, २४ मार्चला होम सायन्स, २८ मार्चला गणित आणि ४ एप्रिलला पेंटिंगची परीक्षा असेल.