CISCE : 10 वी, 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधी होणार ते जाणून घ्या
SSC पाठोपाठ आता आयसीएसईनेही दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
मुंबई : SSC पाठोपाठ आता आयसीएसईनेही दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCE) दहावी (ICSE) आणि 12 वी (ISC) परीक्षेच्या 2021च्या वेळापत्रक आणि तारखांची घोषणा केली आहे. दहावीची परीक्षा 5 मेपासून सुरू होईल, तर 12 वीची परीक्षा 8 एप्रिलपासून सुरू होईल. सहसा सीआयसीएसई बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाते. मात्र, यावर्षी परीक्षा कोविड -19 साथीच्या आजारामुळे लांबणीवर पडली आहे. शालेय समन्वयक मार्फत परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. परीक्षा परिषद कार्यालयातून परीक्षा निकाल मिळणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे.
दहावीची परीक्षा 5 मे ते 7 जूनपर्यंत, तर बारावीची परीक्षा 8 एप्रिल ते 16 जूनपर्यंत होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक आयसीएसईच्या www.cisce.org या वेबसाईटवर आहे. परीक्षा घेताना कोरोनासंदर्भात केंद्रांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याच्या तोंडावर मास्क बंधनकारक असून, दोन विद्यार्थ्यांमधील अंतर सहा फुटांपेक्षा जास्त ठेवण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
ICSE वर्ग 10
आयसीएसई (ICSE) म्हणजेच दहावीच्या वर्गांच्या परीक्षा 5 मेपासून सुरू होतील. CISCEचे (Council for the Indian School Certificate Examinations) सचिव गॅरी अराथून म्हणाले की, भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (ICSE) दहावीची परीक्षा 5 मे ते 7 जून दरम्यान घेण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून परीक्षा सुरू होतील. तर काही पेपर्स सकाळी 9 वाजता घेण्यात येणार आहेत.
आयएसई 12 वीची परीक्षा
इयत्ता 12 वीची अर्थात परीक्षा परीक्षा 8 एप्रिल 2021 पासून सुरू होईल. 8 एप्रिल रोजी संगणक विज्ञान पेपर -2 चे व्यावहारिक नियोजन सत्र होईल, जे 90 मिनिटांचे पेपर असेल. त्याचबरोबर 9 एप्रिलपासून सुरू झालेल्या उर्वरित विषयांच्या परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल.
दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक आयसीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, cisce.org वर पाहिली जाऊ शकतात.
कोरोना कालावधी प्रभाव
त्याचबरोबर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) यंदा मे-जूनमध्ये होणारी परीक्षा रद्द केली आहे. गेल्यावर्षी कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे सीआयसीएसईला परीक्षा रद्द करावी लागली. बोर्डाने ठरविलेल्या पर्यायी मूल्यांकन योजनेच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. योजनेनुसार, ज्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा घेण्यात आली होती, त्या विषयातील तीन सर्वोत्कृष्ट टक्केवारी गुणांच्या आधारे उमेदवारांचे मूल्यांकन केले गेले तसेच त्यांअंतर्गत मूल्यांकन तसेच प्रकल्पांचे काम विचारात घेतले गेले.