अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला पुन्हा मुदत वाढ
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या विद्यार्थ्यांना २९ जून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
मुंबई : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या विद्यार्थ्यांना २९ जून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणींमुळं विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच वेळही वाया गेला. त्यामुळं शिक्षण विभागानं मुदतवाढीचा निर्णय घेतला. यापूर्वी २७ जूनपर्यंत म्हणजे आज अखेरची मुदत होती.
दरम्यान, ऑनलाईन प्रवेश सुरु झाल्यानंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पहिले दोन दिवस साईट बंद होती तर काहींचे अर्ज भरता येत नव्हते. त्यामुळे दुरुस्तीसाठी साईट एक दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर साईट सुसाट झाली खरी पण अनेकांना अर्ज भरता आले नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशाशिवाय वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवेशाला मुदत वाढ देण्यात आली आहे.