मुंबई : कोरोनाचा धोका कायम आहे. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी रुग्णही आढळून येत आहेत. तसेच संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने आणि राज्यातील कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)  ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नोवेल कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दिनांक २२ मार्च २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक २६ एप्रिल २०२० आणि १० मे २०२० रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन्ही सार्वजनिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.



दोन्ही  परीक्षा आयोजनासंदर्भात नवीन तारीख आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेची तारीख निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर एसएमसद्वारे कळवण्यात येणार आहे. उमेदवारांनी वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर अपडेट होणारी माहिती पाहा, असे आवाहन करण्यात आले आहे.