मुंबई : ही माहिती सर्वसामान्यासाठी, सर्वसामान्यांच्या अभ्यासातून आलेली आहे, तुम्ही ही माहिती काळजीपूर्वक वाचली तर आयुष्यात तुमचे लाखो रुपये वाचतील, आणि लहान मुलांच्या भवितव्यासाठी वापरले जातील. हा अनुभव हिशेबी माणसांसाठी लाखो रुपये वाचवण्यासारखा आहे, तेव्हा काळजीपूर्वक वाचा आणि हे समजून घ्या. नंतर तुम्हीच म्हणाल, ही बातमी माझ्यासाठी लाख मोलाची ठरली. जे EMIच्या चक्रात भरडलेले असतात, त्यात क्रेडिट कार्डमधून त्यांचं पिठ पडतं. कोणतेही खर्चिक व्यसन नसताना तुमच्या हातात २ पैस शिल्लक राहत नाहीत, त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.


Credit Card वापरण्याचा बडेजाव करु नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Credit Card वर शॉपिंग करुन पॉईंट मिळवणे, १० ते २० टक्के सूट मिळवणे, यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड घेत असाल, तर हिशेब नक्की ठेवा. विशेष म्हणजे कोणतीही गरज नसताना माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे, यात खूप मोठेपणा वाटत असेल, तर तो तुम्हाला पैशांच्या रुपात चुकवावा लागेल, हे नक्की लक्षात ठेवा. 


Credit Card साठी वार्षिक फी आकारली जाते. ही फी जास्त वाटू नये, म्हणून तुम्ही एवढ्या रुपयांपर्यंत शॉपिंग केली, तर तुम्हाला ही वार्षिक फी माफ होईल, असं आमिष नक्की दाखवलं जातं. काही क्रेडिट कार्डना वार्षिक फी नसते आणि त्यांची शॉपिंग मर्यादा देखील कमी असते.


Credit Card एवढा दंड ट्रॅफिकवालेही आकारत नाहीत


Credit Card ची बिलं भरण्याची तुमची तारीख चुकली तर तुम्हाला एक दंड ठरलेला असतो, समजा तुम्ही १५०० रूपयांची वस्तू घेतली आणि क्रेडिट कार्ड बिलाची तारीख चुकली तर तुम्हाला ३ हजार रूपयांपेक्षा जास्त बिल येऊ शकतं. 


कारण जवळजवळ सर्वच क्रेडिट कार्ड कंपन्या-बँका यांनी कमीत कमी  दंड हा १३०० ते १५०० रुपये ठरवलेला असतो. यावर स्टेट जीएस ९ टक्के आणि केंद्राचा जीएसटी वेगळा ९ टक्के लागला तर आश्चर्य न वाटू देता आधी बिल भरा, नाहीतर तो आकडा पुढच्या वेळेस दीडपट होवू शकतो.


तुमचे पैसे तुम्ही महिन्याभराच्या आत क्रेडिट कंपनीला परत द्यायचे आणि त्यावर स्टेट आणि सेन्ट्रल मिळून १८ टक्के जीएसटी. हे पटतंय का तुम्हाला. 


Credit Card चे बिल तुम्ही वेळेवर भरतात तरी देखील...


Credit Card वरुन मी वस्तू खरेदी केली आहे, EMI आहे आणि कमीत कमी रक्कम बिलावर दिल्याप्रमाणे मी हजार रुपये दर महिन्याला भरतो, म्हणजे मला जास्त पैसे द्यावे लागत नाहीत, असं तुम्हाला वाटतं. तो एक निव्वळ गोड गैरसमज आहे. 


क्रेडीट कार्ड तुम्हाला बिल पाठवताना कमीत कमी बिल याप्रमाणे पाठवतो. म्हणजे व्याज आणि भांडवलातील रक्कम १० टक्क्यांपेक्षा कमीच कट होईल असा तो आकडा असतो. 


तुम्हाला याविषयी शंका असेल, तर हिशेबाला बसा आतापर्यंत किती दिले आणि किती कमी झाले. यातून बाहेर निघण्यासाठी एकच मार्ग आहे. जर तुमच्यावर १ लाख घेणे असेल तर चार टप्यात, तीन टप्प्यात किंवा दोन नाहीतर एकाच वेळेस हे पैस भरुन क्रेडिट कार्डला रामराम ठोका. Credit Card कंपन्यांचे तुमच्या खिशातून अव्वाच्या सव्वा पैसे काढण्याचे १०० पेक्षा जास्त मार्ग आहेत. 


Credit Card मधून कॅश काढण्याची चूक कधीच करु नका 


Credit Card मधून कॅश काढण्याची चूक कधीच करु नका. कारण त्याला ५ टक्के व्याजाने पैसे असतात, सावकारी व्याज समजा. विशेष म्हणजे तुम्ही १० हजारांची शॉपिंग केली आहे आणि १५ हजार कॅश काढले आहेत. 


यानंतर त्याच दिवशी तुम्ही १५ हजार जमा केले, तरी देखील आधी तुमच्या १० हजार शॉपिंगच बिल वजा केलं जाईल आणि तुमचे कॅश काढलेले पैसे तुमच्याकडे १० हजार शिल्लक असतील आणि त्याला व्याज लागेल, म्हणजे सर्वात जास्त व्याज ज्या पैशांना ते पैसे क्रेडिट कार्ड त्यांच्याकडे सर्वात उशीरा हिशेबाला जमा करतं.


ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर ही लिंक सोशल मीडियावर शेअर करा आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे लाखो रुपये वाचवा. कारण कर्जाचे हफ्ते भरण्याच्या नादात आपण बायकोपोरांचे साध्या साध्या मागण्याही पूर्ण करु शकत नाहीत. तेव्हा ही लिंक फेसबूक आणि व्हॉटसअप सारख्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचवा आणि क्रेडिट कार्डबद्दल जागृती करा..


खालील लिंक कॉपी करुन व्हॉटसअप - फेसबूकवर शेअर करा 


https://zeenews.india.com/marathi/education/credit-card-user-never-become-a-crorepati/566406


 


----