मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता म्हणजेच मराठा समाजासाठी (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले आहे. तर अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. हे प्रमाण आता चार टक्के करण्यात आले आहे. याबाबत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबई आणि पुणे महापालिकेच्या ज्युनिअर कॉलेजांतील पन्नास टक्के जागा या पालिकेच्या शाळेतून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहणार आहेत, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


प्रवेश फेऱ्यांचे स्वरुप


द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील. तसेच नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील. नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील आणि मुंबई तसेच पुणे महापालिकेच्या ज्युनिअर कॉलेजांतील पन्नास टक्के जागा या पालिकेच्या शाळेतून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहणार आहेत, असे राज्याच्या शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. याबाबत शासन आदेश काढण्यात आले आहेत.