'हा' आहे बॉलिवूडचा महाफ्लॉप अभिनेता, दिले 3 फ्लॉप चित्रपट, केलंय कोटींचं नुकसान

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबाबत सांगणार आहोत. जो बॉलिवूडचा महाफ्लॉप अभिनेता आहे. 

| Dec 26, 2024, 12:58 PM IST

'हा' आहे बॉलिवूडचा महाफ्लॉप अभिनेता, दिले 3 फ्लॉप चित्रपट, केलंय कोटींचं नुकसान | Bollywood Biggest Flop Hero Zaheer Iqbal Gives 3 Disaster Movies

1/7

फ्लॉप अभिनेता

बॉलिवूडमधील या अभिनेत्याला सिनेसृष्टीत 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्यामध्ये अभिनेत्याने 3 चित्रपट दिले आहेत. जे बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरले. 

2/7

झहीर इक्बाल

आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव झहीर इक्बाल आहे. झहीरने सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेल्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 

3/7

पहिला चित्रपट

झहीर इक्बालसोबत या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतन होती. मात्र, जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला. 

4/7

डबल एक्सल

त्यानंतर झहीर इक्बाल हा 'डबल एक्सल' या चित्रपटात दिसला. अभिनेत्याचा हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला. या चित्रपटात झहीरच्या विरुद्ध भूमिकेत सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी होत्या. 

5/7

फ्लॉप चित्रपट

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बजेट 15 कोटी रुपये होते.  प्रदर्शित होताच हा चित्रपट अनेक दिवस बॉक्स ऑफिसवर होता. पण या चित्रपटाने 5 कोटींपेक्षा कमी कमाई केली होती. 

6/7

रुसलान

2024 मध्ये झहीर इक्बालचा 'रुसलान' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा देखील चित्रपट खूप कमाई करु शकला नाही. या चित्रपटात आयुष शर्मा, विद्या मालवडे आणि सुनील शेट्टी होते. 

7/7

टॉप अभिनेत्री

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 23 जूनला लग्न केलं. सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.