मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी रात्री अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. १३ ते २५ जूनपर्यंत ऑनलाईन अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. तसचं यंदा पहिल्यांदाच बायफोकल अभ्यासक्रमाचे प्रवेशही ऑनलाईन होणार आहेत.  या अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी  २१ जूनला सकाळी ११ वाजता आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स शाखेची पहिली यादी ५ जुलैला जाहीर होणार आहे.