मुंबई : अकरावी आँनलाईन प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. ११ तारखेपासून पहिल्या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकरावी प्रवेशासाठी सुमारे ३० हजार विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. त्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा नव्याने भरणे बंधनकारक करण्यात आलेय. अकरावी प्रवेशप्रक्रियेतील नवी नियमावली आणि तांत्रिक त्रुटी यामुळे चार प्रवेशफेऱ्या संपुष्टात आल्या तरी प्रवेश न मिळालेल्या जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांसाठी खास फेरीचे आयोजन करण्यात आलेय.


पहिल्या चार फेऱ्यांमध्ये नामांकित महाविद्यालयांच्या जागा भरल्या असल्याने या खास फेरीमध्ये उरलेल्या जागांसाठीच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे चांगली गुणवत्ता असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना खास फेरीमध्ये मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.


पहिल्या फेरीमध्येच पहिले महाविद्यालय मिळालेल्या जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांना नियमावलीबाबत अस्पष्टता असल्याने प्रवेशच घेतले नाहीत. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेतून हे विद्यार्थी बाहेर काढले गेले. तसेच तांत्रिक अडचणींमुळे वेळेत प्रवेश घेऊ न शकलेले, पुरेशी कागदपत्रे सादर न केल्याने प्रवेश रद्द  करण्यात आले.


या सर्वासाठी खास प्रवेशफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. चौथ्या प्रवेशफेरीतील प्रवेशप्रकिया संपल्यानंतर म्हणजेच १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ नंतर महाविद्यालयातील उरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


ऑनलाईन फेरीचे वेळापत्रक


१० ऑगस्ट : महाविद्यालयातील उरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध
११ ते १३ ऑगस्ट : खास फेरीसाठी अर्ज करण्याची मुदत
१६ ऑगस्ट : विशेष फेरीची जागा वाटप यादी जाहीर
१८ ते १९ ऑगस्ट : खास फेरीतील प्रवेश निश्चित करण्याची मुदत