Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : बारामती, माहीमसह 'या' 5 मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : शनिवार 23 नोव्हेंबर हा दिवस सर्व राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार आहे, या पक्षांचं भविव्य. राज्यातील 288 मतदारसंघातील 5 जागांकडे खास करुन सर्वांचं लक्ष लागलंय. ती मतदारसंघ कोणती आहेत पाहूयात. 

| Nov 22, 2024, 21:41 PM IST
1/7

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असल्याने या ठिकाणी कोण बाजी मारते हे पाहणे औत्सुकाचं ठरणार आहे. 

2/7

या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यातील पाच मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्व देशाच लक्ष लागून राहिलंय. 

3/7

बारामती विधानसभा मतदार संघ

पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. काका अजित पवार की पुतण्या युगेंद्र पवार कोण बाजी मारणार हे शनिवारी समजणार आहे. 

4/7

माहिम विधानसभा मतदार संघ

विधानसभा निवडणुकीत सर्वात गाजलेला मतदारसंघ म्हणजे माहिमचा होता. इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला, तोही विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेही इथे तगडा उमेदवार दिला तो म्हणजे महेश सावंत. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा हातात जाणार हे पाहावं लागणार आहे.   

5/7

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अजित पवार यांनी झीशान सिद्दीकीवर विश्वास दाखवला. दुसरीकडे शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत रिंगणात आहे. त्यासोबत मनसे उमदेवारी वरुण सरदेसाई या लढत असल्याने ही सोपी नाहीय. 

6/7

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ

कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या लढतीकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. 

7/7

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ

महायुतीतील भाजपचे राम शिंदे तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांच्यातील थेट लढत आहे. गेल्या वेळी राम शिंदेंचा पराभव करुन रोहित पवार यांनी राजकारणात एन्ट्री मारली होती. आता ते दुसऱ्यांदा जिंकणार का हे पाहावं लागेल.