नवी दिल्ली : आजची तरूणाई ही समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) प्रचंड कार्यरत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत कार्यरत राहणे हा जणून त्यांच्या जीवनशैलीचाच एक भाग. पण, तुम्हाला माहिती आहे का, सोशल मीडियावर कार्यरत राहण्यामध्ये मुलांपेक्षा मुलींनीच जास्त बाजी मारली आहे. पण, सातत्याने सोशल मीडियावर कार्यरत राहणे हे आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड धोकादाई आहे. संशोधकांनी संशोधनाने हे सिद्ध केले आहे.


कारणाशिवाय वेळ बर्बाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसेक्स विद्यापीठ आणि यूसीएल विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार पौगंडावस्थेतील मुलांच्या तुलनेत मुली या सोशल मीडियावर जास्त कार्यरत असतात. या सर्वाचा परिणाम त्यांचया आरोग्यावर होतो. सोशल मीडियावर पौगंडावस्थातील मुले जो वेळ खर्च करतात त्यातून त्याच्या करिअर किंवा आयुष्यासाठी फारसे काहीच हाती लागत नाही. उलट आयुष्यातील प्रदीर्घ कालावधी मात्र कारणाशिवाय बर्बाद होतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.


लेखिका आणि सोशल मीडियाची अभ्यासिका कारा बुकरने म्हटले आहे की, सोशल मीडियावर अधिक वेळ खर्च करणाऱ्या मुलींनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया त्या देत असलेला वेळ त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. 


यूके हाऊस होल्ड पॅनल स्टडीचा डेटावरून अभ्यास


शोधकर्त्यांनी केलेल्या संशोधनानुसार १३ वर्षे वयोगटातील मुली या मुलांपेक्षा एक तास अधिक काळ सोशल मीडियावर खर्च करतात. तर, आकडेवारीत बोलायचे तर, ५९ टक्के मुली आणि ४६ टक्के मुले सोशल मीडियावर प्रतिदिन एक किंवा त्याहून अधिक काळ घालवतात. पण, या कालावधीत ही मुले अधिक आनंदी दिसली असेही संशोधक म्हणतात. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी यूके हाऊस होल्ड पॅनल स्टडीचा डेटा वापरण्यात आला. यात १० ते १५ वर्षे वयोगटातील ९,८५९ मुलांना प्रश्न विचारण्यात आले की, ते सोशल मीडियावर प्रतिदिन किती वेळ खर्च करतात.