10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी कुठलीही परीक्षा नाही , थेट भरती
सरकारी नोकरी कोणाला नको असते. 10 वी पास होताच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी चुरस रंगते. आरक्षण आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्पर्धेत आपला नंबर लागावा यासाठी अनेक तरुण धडपडत असतात.
मुंबई : सरकारी नोकरी कोणाला नको असते. 10 वी पास होताच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी चुरस रंगते. आरक्षण आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्पर्धेत आपला नंबर लागावा यासाठी अनेक तरुण धडपडत असतात. जर आपण दहावीनंतर आयटीआय केले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप म्हत्वाची आहे. कारण भारतीय रेल्वेने उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) अंतर्गत 480 अॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी रेल्वेने अधिसूचनाही जारी केली आहे. 10 उत्तीर्ण इच्छुक उमेदवार उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन विहित नमुन्यात अर्ज करू शकतात
480 पदांसाठी भर्ती
उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) अंतर्गत 480 अॅप्रेंटिस पदांसाठी आर्ज मागविण्यात आले आहेत.
यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 मार्चपासून सुरू झाली आहे.
अर्ज कसा कराल-
उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) भरतीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर mponline.gov.in जाऊन आँनलाईन अर्ज करावा लागणार ,आपली अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 मार्च 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2021 आहे.
10 वी आणि ITI असणे आवश्यक
या पदभरतीसाठी केवळ दहावी पासच विद्यार्थी अर्ज करू शकतात. परंतु उमेदवारांना एनसीव्हीटीशी संबंधित एखाद्या संस्थेकडून आयटीआय केले असणे आवश्यक आहे. यासह ज्यांनी पहिल्यांच प्रयत्नात दहावी उत्तीर्ण केली आहे. आयटीआयमध्ये चांगले गुण मिळवले असतील आशा उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
कोणत्या पदासाठी भर्ती होणार
उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) अंतर्गत भरली जाणारी पदे
फीटर- 286 पद
वेल्डर- 11 पद
मैकेनिक- 84 पद
बढ़ई- 11
इलेक्ट्रीशियन- 88 पद
एकूण - 480
वयाची आट - अॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे
वय - 15 ते जास्तीत जास्त 24 वर्ष असायला हवे.
अर्ज शुल्क
सामान्या वर्गासाठी उमेदवारांना 170 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर इतर उमेदवारांना शुल्क लागणार नाही