मुंबई : Admission 2021: स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (students)  तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र (caste certificate) नसल्याने इयत्ता अकरावीत प्रवेश (XI admission) घेताना अडचण येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरता प्रवेश घेण्याची सोय करण्यात आली आहे. (Students Admission)


शुल्कात 15 टक्के कपात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्कात 15 टक्के कपात करून शुल्क जाहीर करण्यात आलंय. त्याबाबतची माहिती अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर देण्यात आली. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रवेश प्रक्रियांसाठी हा नियम लागू आहे.  


मुंबई विद्यापीठ अव्वल


दरम्यान, मुंबई युनिर्व्हसिटीला नॅककडून ए प्लस प्लस दर्जा मिळाला आहे. विद्यापीठाला 3.65 श्रेयांक मिळाले असून राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत मुंबई विद्यापीठ अव्वल ठरले आहे. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाला विविध उपक्रम करण्याचे स्वातंत्र्यही मिळणार आहे.


11वी प्रवेश प्रक्रिया


पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 308 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 10 हजार 725 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.  पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीसाठी  30 हजार 802 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेत. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.