मुंबई : मुख्याध्यापक संघटनेनं मुक्त शाळा अर्थात ओपन स्कूलला विरोध दर्शवलाय. मराठी शाळा बंद करण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेनं केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी शाळा बंद होत असताना त्याला पर्याय आणण्याची गरज काय असा सवालही संघटनेनं केलाय. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत पास करावेच लागणार आहे. अशा परिस्थितीत ओपन स्कूलचा फायदा काय असा सवालही संघटनेनं विचारलाय. 


ओपन स्कूलबाबत शासन आदेश काढण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात येणार असून ते राज्य मंडळाचा भाग म्हणून काम करेल. या मंडळा अंतर्गत पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीची परीक्षा देता येईल. त्यासाठीचा अभ्यासक्रमही वेगळा असेल. या सर्व परीक्षांची प्रमाणपत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षांनुसार समकक्ष असतील. तसंच सरकारी नोकरीसाठीही ही प्रमाणपत्र वैध मानण्यात येतील. 


काय आहे ओपन स्कूल 


राज्यात मुक्त शाळेची अत्यंत अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय. याबाबत शासन आदेश काढण्यात आलाय. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात येणार असून ते राज्य मंडळाचा भाग म्हणून काम करेल.


या मंडळा अंतर्गत पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीची परीक्षा देता येईल. त्यासाठीचा अभ्यासक्रमही वेगळा असेल. या सर्व परीक्षांची प्रमाणपत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षांनुसार समकक्ष असतील. तसंच सरकारी नोकरीसाठीही ही प्रमाणपत्र वैध मानण्यात येतील.