मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षांचा निकाल 30 मे रोजी लागणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. तंत्रज्ञान म्हटलं की त्यामध्ये बिघाड होणं हे आलेच ! अनेकदा एकाचवेळी अनेकांनी वेबसाईट उघडल्याने निकाल पाहणं अशक्य होते. जर निकाल पाहताना साईट क्रॅश झाल्यास किंवा इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसल्यास तुमच्या मोबाईलवर निकाल पाहण्याची सोय उद्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.


मोबाईल कसा पहाल निकाल ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारावीच्या विद्यार्थ्यांना एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल पाहण्याची सोय खुली करण्यात आली आहे. याकरिता विद्यार्थ्यांना केवळ एक मेसेज पाठवायचा आहे. 


मोबाईच्या टेक्स्ट मेसेजमध्ये जा. 


तेथे  MHHSC<space>SEAT NO (सीट नंबर) 


हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा.  


कोणत्या संकेतस्थळावर पहाल निकाल ? 


mahresult.nic.in ही निकालाची मूळ साईट आहे, येथे सर्वात आधी निकाल पाहता येणार आहे.
result.mkcl.org,
examresults.net, 
results.gov.in


१४ लाखांवर परीक्षार्थींचा निकाल


बारावी परीक्षेला राज्याच्या ९ विभागांमधून १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी बसले होती. राज्यभरातील २ हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.