इयत्ता बारावी परीक्षेचा आज निकाल, इथे पाहा संपूर्ण माहिती
दुपारी १ वाजल्या पासून हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणारआहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेचा निकाल आज (बुधवार, ३० मे) जाहीर होतोय. दुपारी १ वाजल्या पासून हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणारआहे.
कुठे पाहाल निकाल?
maharesult.nic.in वर निकाल जाहीर केला जाणार आहे. सकाळी ११ वाजता बोर्डाकडुन घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येतील. या परीक्षेसाठी राज्यातील ९ विभागातून एकूण १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्या मध्ये ८ लाख ३४ हजार १३४ विद्यार्थी आणि ६ लाख ५० हजार ८९८ विद्यार्थिनी यांचा समावेश आहे... यामध्ये विज्ञान शाखेचे ५ लाख ८० हजार ८२०, कला शाखेचे ४ लाख ७९ हजार ८६६ आणि वाणिज्य शाखेचे ३ लाख ६६ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ५७ हजार ६९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
(हेही वचा - डिअर जिंदगी : अपेक्षा तर त्यांच्याकडूनच आहे, ज्यांना कमी मार्क्स आहेत!)