मुंबई : आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या १० वी तसेच १२ वीच्या परीक्षांना प्रत्यक्ष हजर न राहण्याचा पर्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणवाटप केले जाईल, याची योजना बोर्डाने २२ जूनपर्यंत सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधावारी दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ICSEच्या १० वीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. परंतु या परीक्षांना विद्यार्थी हजर राहिल्यास कोरोनाचा मोठा धोका वाढू शकतो, म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा न देण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर बुधावारी सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.



ICSE बोर्डाने सर्व संलग्न शाळाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभराचे गुण मागवून घेतले आहेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने गुणवाटपाची योजना आखली जाईल, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



राज्य सरकारने परीक्षा घेण्यास मनाई केली तरी आयसीएसई बोर्ड तो निर्णय स्वीकारेल असे बोर्डाच्या वकीलांनी बुधावारी न्यायालयात सांगितले.