रेल्वेत जम्बो भरती, १.६० लाख जागांसाठी भरती होणार
भारतीय रेल्वेत जम्बो भरती करण्यात येणार आहे. टेक्नोशियन्स आणि असिस्टंट लोको पायलटसह अन्य पदांसाठी रेल्वेमंत्रायलयाने देशव्यापी भरती अभियान सुरु केले.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत जम्बो भरती करण्यात येणार आहे. टेक्नोशियन्स आणि असिस्टंट लोको पायलटसह अन्य पदांसाठी रेल्वेमंत्रायलयाने देशव्यापी भरती अभियान सुरु केले. यासाठी ही भरतीची प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
रेल्वे मंत्रालायाने ग्रुप ‘जी’मधील भरती प्रक्रियेत ३२ हजार जागांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रुप ‘उ’मध्ये आता ९० हजार जागांऐवजी तब्बल १ लाख ३२ हजार ६४६ जागांसाठी भरती होणार आहे.
टेक्नोशियन्स आणि असिस्टंट लोको पायलटसह अन्य पदांसाठीची परीक्षा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत रेल्वेमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी गोयलयांनी ही माहिती दिली. या श्रेणीतील पदांसाठी सेवेच्या खडतर अटी ठेवण्यात आलेल्या असतात. त्यामुळे महिला या पदांसाठी कमी प्रमाणात अर्ज करतात, असे गोयल म्हणालेत.