`इंडियन ऑइल`मध्ये नोकरीची संधी, करा अर्ज आणि मिळवा नोकरी
सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पाहूयात कुठल्या पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे.
मुंबई : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पाहूयात कुठल्या पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे.
पद : ज्युनिअर ऑपरेटर (ग्रेड I)
एकूण जागा : २५
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक /इलेक्ट्रिशियन /मशिनिस्ट/फिटर)
वयोमर्यादा : १८ ते २६ वर्षे
पद : ज्युनिअर ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I
एकूण जागा : ३३
शैक्षणिक पात्रता : ४५% गुणांसह १२ वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना आणि १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : १८ ते २६ वर्षे
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख - १६ जून २०१८
या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://www.iocl.com या संकेतस्थळावर पहायला मिळेल.
अर्ज करण्यासाठी https://www.iocl.com या लिकंवर क्लिक करा.