JEE Advanced Result: प्रणव गोयल देशात, ऋषी अग्रवाल राज्यात पहिला
....
मुंबई: देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लगून राहिलेल्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल आज (रविवार, १० जून) जाहीर झाला. आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून १,५५,१५८ बसले होते. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, या परीक्षेत ३६० पैकी ३३७ गुण मिळवत हरयाणातील पंचकुला येथील प्रणव गोयल देशभरातून पहिला आला. तर, ऋषी अग्रवाल हा राज्यातून पहिला आला आहे.
दरम्यान, साहिल जैन, कलश शहा हे विद्यार्थ्यी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख हिने ३६० पैकी ३१८ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. एकूण निकालात ती देशातून सहावी आहे. या परीक्षेत एकूण १६०६२ विद्यार्थी आणि २०७६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. तर, सर्वसाधारण गटातील ८७९४, ओबीसी प्रवर्गातून ३१४०, अनुसूचित जातींमधून ४७०९ आणि अनुसूचित जमातींमधून १४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जाईई परीक्षा निकालाबाबत महत्त्वाची माहीती
जेईई परीक्षेचा निकाल जाणून घेण्यासाठी jeeadv.ac.in हे संकेतस्थळाला भेट द्या.
ओबीसी प्रवर्गात मवूरी सिवा कृष्ण मनोहर (विजयवाडा), एससी प्रवर्गातून आयुष कदम (कोटा), एसटी प्रवर्गातून जटोथ शिव (हैदराबाद) हे तरूण अव्वल आहेत.
पटियालाचा मनन गोयल दिव्यांगातून पहिला आला आहे.