मुंबई: तुम्हाला जर जीन्स  वापरायला आवडत असले तर, ती खरेदी करताना काही गोष्टींचा विचार जरूर करा. ज्यामुळे ती जीन्स  तुमची आणि पाहणाराचीही आवडती होऊन जाईल. म्हणूनच जाणून घ्या जीन्स खरेदी करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाल....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपड्याच्या दुकानात गेले की, नेमकी कोणत्या प्रकारची जीन्स खरेदी करावी? हा एक गोंधळात टाकणारा सवाल. कारण, पहावी ती जीन्स  चांगलीच वाटत असते. अशा वेळी काही गोष्टी ध्यानात घेतल्या की, हा गोंधळ दूर तर होतोच. पण, तुम्हाला आवडती, कफर्टेबल, स्टायलीश आणि गुड लुकींग जीन्स  खरेदीही करता येते. त्यासाठी पुढील मुद्दे मार्गदर्शक ठरू शकतील.


क्वालिटी कापड


जीन्स  खरेदी करताना कापडाची गुणवत्ता जरूर पहा. जीन्स चे फॅब्रिक चांगले असेल तर, जीन्स  अधिक काळ टिकते. तिचे कापडही विरत नाही. जीन्स खरेदी करताना गडबड करू नका. कापड व्यवस्थितपणे हातात घेऊन पहा. तसेच, जिन्सचा ब्रॅण्ड कोणता आहे हेही पहा. पण, केवळ ब्रॅण्डच्याच मागे धाऊ नका. कारण, अनेकदा साध्या ब्राण्डच्या जिन्सही अतिशय उत्कृष्ट असतात.


जिन्समध्ये कॉटन किती?


जिन्स खरेदी करताना तिच्यासोबत जोडलेले लेबल जरूर वाचा. यात तुम्हाला ही जिन्स डेमिन जिन्स आहे की, कॉटन जिन्स आहे हे लक्षात येईल. अनेकदा जिन्सचे कापड लांबण्यासाठी त्यात डेनिमसोबत लायक्रासुद्धा वापरला जातो. लक्षात ठेवा की, जिन्समध्ये डेनिम जर 90 ते 100 टक्के नसेल तर, ती जिन्स तुम्हाला आरामदाई वाटणार नाही. तसेच, तिचे फिटींगही ठिक असणार नाही.


नवीन्याची अनुभूती घ्या


आपल्या नेहमीच्या शैलीतून थोडेसे बाहेर येत काही नवा लुकही ट्राय करा. अनेक लोक असे असतात की, ते नेहमी जीन्स खरेदी करतात. मात्र, त्यांची स्टाईल ठरलेली असते. त्यांना जिन्समध्ये नवी स्टाईल आली आहे याचा पत्ताच नसतो. 


हेतू ठरवा


जीन्स खरेदी करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही ती का खरेदी करता आहात. कारण, ऑफिसमध्ये कॅज्युअल कपडे वापरले जातात. तर, मित्रांसोबत, पार्टीला, समारंभात जात असताना वेगळ्या पद्धतीची जीन्स वापरली जाते. त्यामुळे ऑफिशिअल वापरासाठी तुमची जिन्स अतिशय साधी आणि क्लासी असावी तर, तुम्ही फिरायला जात असाल तर, तुम्हाला स्लिम फिट किंवा डिजायनर जिन्स तुम्ही ट्राय करू शकता.