नवी दिल्ली: तो ना समजायला कठीण आहे. काही केल्या त्याच्या मनाचा तळच लागत नाही. तो पक्क्या आतल्या गाठीचा आहे, अशी वाक्ये आपण सर्ऱ्हास ऐकतो. पण, समोरच्या व्यक्तिचे वर्तन पाहून त्याच्या इशाऱ्यांचे अंदाज तुम्हाला लावता आल्यास तुम्ही त्याच्या मनातील अंदरकी बात सहज ओळखू शकता.


व्यक्ती, त्यांच्या हालचाली आणि त्याचे अर्थ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादा व्यक्ती गाल आणि केस बाहेरच्या बाजूला ओढत असेल, त्याचा श्वास वाढला असेल आणि तो ओठ दाबून धरत असेल तर, समजून जा की त्याला तुमची गोष्ट पटली नाही. तो त्याचा अस्विकार करण्याच्या विचारात आहे. एखादा व्यक्ती जर गाल फुगवून हवा तोंडावाटे बाहेर सोडत असेल, डोळे साधारण गोलाकार झाले असतील शरीर काहीसे ताणले असेल तर, तो व्यक्ती पेचात आहे. त्याला प्रश्न पडला आहे की, आता काय करावे?


गाल, डोळे, चेहरा लाल होणे


खरेतर गालावर चढलेल्या लालीचा संबंध अधिकतेने लाजण्याशी येतो. पण, लाल गालांसोबतच डोळेही तितकेच लाल आणि चेहऱ्यावरच एक करारीपणा आला की समजा तो व्यक्ती रागावला आहे. तोंडात काहीतरी चघळल्याची हालचाल आणि घट्ट मिठलेले ओठ ही 'नर्वसनेस'ची निशाणी आहे. अनेकदा अतिआश्चर्यानेही गालाची लाली वाढते. वारंवार केस ठिक करणे हे सुद्धा नर्वसनेसचे लक्षण आहे.


केस आणि बॉडी लॅंग्वेज


आपली बॉडी आणि केस यांचाही स्वभावाशी घनिष्ट संबंध आहे. आजकाल अनेकदा फॅशन म्हणून केस विविध रूपात कापले जातात. तरीसुद्धा केसांचे वळन हे तुमच्या स्वभावाशी संबध दर्शवते. केसांबाबत आपल्याकडे पारंपरी संकेत आहेत. उदा. लष्करातील जवान, पब बाहेर उभे असलेले बाऊन्सर यांची हेअरस्टाईल शिस्तप्रियता दाखवते. तर, लांब, मोकळे सोडलेले केस हे निवांतपणा दर्शवतात. पण, हेच केस जर लाब आणि मोकळे असतील पण त्यात गुंता किंवा चिकटपणा जाणवत असेल तर, ते आजारी किंवा कंटाळलेपणाचे लक्षण समजले जाते.