राज्यात आता शाळांसाठी केआरए
कॉर्पोरेट जगात परवलीचा शब्द म्हणून प्रचलित असणारे केआरएची पद्धत आता शाळांसाठी लागू करण्यात आलीय.
मुंबई : कॉर्पोरेट जगात परवलीचा शब्द म्हणून प्रचलित असणारे केआरएची पद्धत आता शाळांसाठी लागू करण्यात आलीय.
शालेय स्तरावरही दर्जा सुधरवण्यासाठी आता शाळांनाही केआरए पद्धत सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढकार घेतलाय.
केआरएची अंमलबजावणी करून राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा देशात पहिल्या तीन राज्यांमध्ये आणणे आणि वाढत्य़ा गळतीला आळा घालणे ही दोन या नव्या निर्णयामागची उदिष्ट आहेत.
शालेय स्तरावर अधिकाऱ्यांनी या पद्धतीसाठी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.