मुंबई : राज्यातील नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग (school) सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. तसे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण मंत्री (Education Minister) प्रा. वर्षा गायवाड  (Varsha Gaikwad) यांनी दिले आहे.  कोरोना प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांतील शाळा सुरू करताना जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना शिक्षण मंत्री गायवाड यांनी केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.



 या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण मंत्री गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.


मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद


दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तसेच अन्य काही देशातही कोरोणाचे रुग्ण वाढत आहे. देशात दिल्लीनंतर गुजरातमधील अहमदाबादमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने तेथे नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. आता मुंबईतही दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा या ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पालिका प्रशासनाने कोणताही धोका नको, म्हणून हा निर्णय घेतला आहे.