महाराष्ट्रातील चमत्कारिक गाव! जिथे घरचं काय बँकांना देखील दरवाजे नाहीत; तरीही कुणाची चोरी करण्याची हिंमत होत नाही

जाणून घेऊया महाष्ट्रातील चमत्कारिक गावाविषयी जिथे घरांना दरवाजे नाहीत. 

Nov 20, 2024, 16:36 PM IST

Facts About Shani Shingnapur :   भारतातच काय संपूर्ण जगात कुठेही दरवाजे नसलेले एकही घर सापडणार नाही. महाराष्ट्रात मात्र, असे एक गाव आहे जेथे घरं काय, बँकांना देखील दरवाजे नसतात. शिंगणापूर असे या गावाचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान आहे.  शिंगणापूर गावात शनिदेवाचा अद्भुत चमत्कार पहायला मिळतो. येथे घरांना दरवाजे नसताना देखील चोरीच्या घटना घडत नाहीत. 

 

1/8

महाराष्ट्रात एक असे चमत्कारिक गाव आहे जिथे घरचं काय बँकांना देखील दरवाजे नसतात. दरवाजे नसल्यामुळे कुणीही अगदी सहज घरात किंवा बँकेत प्रवेश करु शकतो. मात्र, असे असले तरी तरीही कुणाही या गावात चोरी करण्याची हिंमत होत नाही.     

2/8

  शनि शिंगणापूर गावातील लोकांची शनि देवावर प्रचंड श्रद्धा आहे. यामुळेच कोणी घरांना दरवाजे लावण्याचा प्रयत्न देखील करत नाही. 

3/8

गावात कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामागे साडेसात वर्षांच्या अशुभ कालावधीचा शाप शनि देव देतात असे येथील ग्रामस्थ मानतात.  

4/8

 घरांना दरवाजे नसतानाही गावात चोरीसारख्या घटना घडत नाहीत. यामुळेच इथे घरं, सर्व कार्यालये तसेच बँंकाना देखील दरवाजे नाहीत.  

5/8

शनि शिग्नापुर गावातील स्थानिक लोकांना असा विश्वास आहे गावातील शनिदेव त्यांचे संरक्षण करतो, आणि प्रत्येक संकटातून वाचवतो.  

6/8

शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात. 

7/8

शनि मंदिरामुळे गावाच्या नावात शनि जोडले गेले आहे. अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. 

8/8

 शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे जीथे घरांना दरवाजे नसतात. यामागे एक रहस्यमयी कारण आहे.