COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल आज (बुधवारी) जाहीर झाला. दुपारी १ वाजलेपासून विद्यार्थ्यां हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


दरम्यान, यंदाच्या वर्षी कोकण विभागाने जोरदार बाजी मारली असून राज्यात सर्वात प्रथम येण्याचा मान कोकण (९४टक्के) विभागने मिळवला आहे. तर, नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. ९२.३६ टक्के विद्यार्थीनी तर, एकूण ८८.४१ विद्यार्थी इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. 


विभागनिहाय टक्केवारी- 


कोकण - ९४.८५,


पुणे - ८९.५८


नागपूर - ८७.५७


औरंगाबाद - ८८.७४


मुंबई - ८७.४४


कोल्हापूर - ९१.००


अमरावती - ८८.०८


नाशिक - ८६.१३


लातूर - ८८.३१


(हेही वचा  - डिअर जिंदगी : अपेक्षा तर त्यांच्याकडूनच आहे, ज्यांना कमी मार्क्स आहेत!)


शाखानिहाय निकाल- 


विज्ञान - ९५.८५


कला - ७८.९३


वाणिज्य - ८९.५०


व्यवसाय अभ्यासक्रम - ८८.४१


कुठे पाहाल निकाल?


maharesult.nic.in वर निकाल जाहीर केला जाणार आहे.  सकाळी ११ वाजता बोर्डाकडुन घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येतील. या परीक्षेसाठी  राज्यातील ९ विभागातून एकूण १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्या मध्ये ८ लाख ३४ हजार १३४ विद्यार्थी आणि ६ लाख ५० हजार ८९८ विद्यार्थिनी यांचा समावेश आहे... यामध्ये विज्ञान शाखेचे ५ लाख ८० हजार ८२०, कला शाखेचे ४ लाख ७९ हजार ८६६ आणि वाणिज्य शाखेचे ३ लाख ६६ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती  तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ५७ हजार ६९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.