महाराष्ट्र राज्याच्या गुप्तवार्ता विभागात भरती, असा करा अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्र राज्याच्या गुप्तवार्ता विभागात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्हीही गुप्त वार्ता विभागात नोकरी मिळवू शकता. एक नजर टाकूयात या संपूर्ण भरती प्रक्रियेवर...
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्र राज्याच्या गुप्तवार्ता विभागात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्हीही गुप्त वार्ता विभागात नोकरी मिळवू शकता. एक नजर टाकूयात या संपूर्ण भरती प्रक्रियेवर...
राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या विभागात सरळसेवेने सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी (गट - क) या संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
पद : सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी
एकूण जागा : २०४
वेतनश्रेणी : रुपये ५,२००-२०,००० (ग्रेड वेतन रुपये २,४००/-)
शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३० वर्षे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३३ वर्षे
शुल्क :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५२५ रुपये
मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३२५ रुपये
माजी सैनिक उमेदवारांकरिता १०० रुपये
ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी :
दिनांक २९/०५/२०१८ ते दिनांक १२/०६/२०१८ (रात्री १२ वाजेपर्यंत)
प्रवेश पत्र (हॉल तिकिट) ऑनलाईन प्रिंट काढून घेणे :
दिनांक २५/०६/२०१८
ऑनलाईन परिक्षेचा दिनांक :
दिनांक १३/०७/२०१८ ते १४/०७/२०१८
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा www.mahapariksha.gov.in आणि www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर जाहिरात तसेच माहिती पत्रक आणि भरतीची सवस्तर माहिती उपलब्ध आहे.
या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर पहायला मिळेल.
अर्ज करण्यासाठी https://mahapariksha.gov.in/ या लिकंवर क्लिक करा.